<
मुंबई-(प्रतिनिधी) – जगभरात कोरोना रोगाने थैमान मांडले असून या रोगापासून जनतेला सावध करण्याचे काम जेवढे केंद्र व राज्य सरकार करत असले तरी नगर जिल्हयातील निमगाव जाळी येथील व मुंबई येथे जोंधळे एज्युकेशनल संस्थेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख सागर जोंधळे यांनी आपल्या स्वखर्चातून मुंबई नगरीमध्ये मटन, मासे, फळभाजी विक्रेत्यांना मास्क वाटप करुन जनजागृतीची मोहीम राबवत आहे.
या रोगाचा सामना आपण करु शकतो, असेही ते या माध्यमातून सांगत आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टातील सर न्यायाधीश धर्माधिकारी व बोरकर यांच्या समोर 1897 अॅपडमीक डिसीज अॅक्ट याला पुर्णपणे बदलण्याची आणि वेगळा आयोग स्थापन करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर 17 पाने सल्ला हा सर न्यायाधीशांच्या मार्फत शासनाला देवू केला होता. त्यावर कोर्टाने दुसर्याच दिवशी शासनाला आपली बाजू मांडण्यास सांगितली असता, शासनाने त्या सुचविलेल्या मागण्या मान्य केल्या असल्याचे म्हणणे दाखल केले. आज पुन्हा त्यावर सुनावनी होणार असुन निकाल लागणार आहे.
या रोगाविषयी राबवित असलेले राज्य सरकार राबवित असलेले उपाययोजनांचा अहवाल सर न्यायाधीशांना सादर करण्यात यावा अशी मागणीही श्री. जोंधळे यांनी केली.
मुंबईमधील सर्व मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, मटन मार्केट ज्या महिला व वृध्द तरुण यांना त्यांनी स्वखर्चाने मास्क वितरण करत या रोगापासून आपण बजाव करु शकता याबाबत त्यांनी त्यांना सॅनीटायझर याने पंधरा ते वीस मिनिटांनी हात स्वच्छ धुवून स्वच्छतेबाबत संदेश दिला.
या रोगापासून आपण ग्राहकांना देखील संदेश द्यावा असा सल्ला देखील जोंधळे यांनी दिला आहे. जगावर मोठे संकट ओढवले असले तरी देशाचे पंतप्रधान ते संपुर्ण जगातील राजकीय नेत्यांपासून सर्वांनीच या रोगाचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
सामाजिक संघटनांनी देखील एकत्र न येता आपापल्या पध्दतीने या रोगाविषयी समाज प्रबोधन करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल राज्य भरात सर्वत्र कौतूक होत असून जोंधळे परिवाराने आजपर्यंत सामाजिक व शैक्षणिक कार्यात जो ठसा उमटविला तो ठसा आज जगावर आलेल्या संकटाला सामोरे जाण्याचा प्रयत्न सागर जोंधळे यांनी दाखवून दिला आहे.
त्यांच्या या कौतूकास्पद उपक्रमाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ना. एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, प्रसिध्द प्रमुख नवनाथ जाधव, कोकण विभाग प्रमुख भगवान चंदे यांसह राज्यभरातील पत्रकारांनी अभिनंदन केले.