<
प्रांतधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार : चौकशीची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय कामाच्या नावाखाली मोहाडी परिसरात असलेल्या हजारो ब्रासचा वाळू ठिय्या बाबत प्रांतधिकारी, जळगाव यांच्या कडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. जिल्ह्यात कुठेच वाळू लिलाव झाली नसतांना याठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त व्यक्त होत आहे.
जळगाव तालुका हद्दीतील गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उचल करून घेण्यासाठी शेकडो ट्रॅक्टर व शेकडो मजूर राबत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत असतांना आता मोहाडी गावच्या उतारावरून खाली जातांना उजव्या बाजूला हजारो ब्रास वाळू चा ठिय्या आढळून आला आहे.शहराच्या लगत एवढा मोठा वाळूसाठा महसूलच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत प्रांतधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून प्रांतधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश देखील दिले आहे.