संचार बंदीचे उल्लंघन ; दुकाने उघडी ठेवल्याने दोन जणांवर गुन्हे दाखल ; कासोदा पोलीसांची कारवाई

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) :- कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथम जमावबंदी, नंतर संचारबंदीचा आदेश लागू झाला. असे असताना अत्यावश्‍यक सेवा वगळता दोन व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली.मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत इतर व्यावसायिकांना योग्य तो इशारा दिला.
सरकारने दवाखाने, रुग्णालये, मेडिकल दुकान, किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आदी अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर प्रकारच्या विक्रेत्यांना “बंदी’ घातली आहे. यामागे गर्दी टळून संसर्ग पसरणार नाही, असा उद्देश आहे. तरीही या दुकानदारांनी आदेशाचे पालन केले नाही. त्यात पोलिसांनी दि.२४ मार्च मंगळवार रोजी गावातील सैय्यदवाडा परिसरात संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असतांना इसम नामे दिलशान अली जहीर अली सैय्यद वय ३० वर्षे रा.बिजलीशाह चौक कासोदा हा जलगाव मावा कुल्फी नावाचा बोर्ड असलेली लोटगाडीवर जिलेबी बनवुन विक्री करीत असतांना मिळून आला म्हणुन त्याच्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांचे आदेशाची अवमान्यता केली म्हणुन येथील पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे येथील व्यावसायिक, दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. तसेच येथील मेनरोड परिसरात ६ : ४५वाजेच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असतांना इसम नामे अमोल राजेंद्र भोई वय ३० वर्षे रा.भोई गल्ली कासोदा हा साई फूल भांडार नावाचा बोर्ड असलेल्या टेबलवर शेव मुरमुरे विक्री करतांना मिळून आला , म्हणुन त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.त्यांनी दुकान सुरू ठेवल्याने गर्दी झाली होती.म्हणुन या दोघांवर कासोदा पो.स्टे.ला भा.द.वि. कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई स.पो.नि.रवींद्र जाधव यांनी दिलेल्या आदेश व मार्गदर्शनाखाली पो.ना.युवराज कोळी ,पो.ना.शरद राजपूत , पो.कॉ.इम्रान खान यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here