कृती फाऊंडेशनच्या वतीने २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना मास्क, सँनिटायझर, चहा नाश्त्याचे वाटप

जळगांव(प्रतिनीधी)- सध्या संपूर्ण जगात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. या रोगावर मात करण्यासाठी, आपल्या परिवाराच्या स्वास्थ्यासाठी आणि प्रशासनाच्या मदतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना त्रिवार मानाचा मुजरा. ON DUTY 24 HRS असलेल्या या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेता कृती फाऊंडेशन तर्फे  उपाध्यक्ष सुजीत माळी आणि सहकारी तुषार महाजन  यांची कन्या प्रतिक्षा हिच्या ९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुषार महाजन यांचे संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील संपूर्ण पोलीस स्टेशन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना मास्क, सँनिटायझर, चहा, नाश्ता व पाणी बाटली वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त सिग्नल पाँईंट, राष्ट्रीय विद्यालय, धुळे बायपास, टोल नाका याठिकाणी देखील कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. पेट्रोलींग साठी व्यस्त असलेल्या पोलीस गाड्या यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील वाटप करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here