कासोद्यातील कोरोना संशयित तरुणाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ):- येथील सव्वीस वर्षीय तरुण लक्ष्मण पांडुरंग पाटील आज दि.25 मार्च रोजी पुण्याहून कासोद्यात आला . ग्रामस्थांनी त्याला आजारी पनाचे लक्षण असल्याचे पाहून त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले . तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.चेतन वाघ , व डॉ.निशाद शेख यांनी त्याला सर्दी , खोकला असल्याचे लक्षण दिसून आल्याने . तरुणाची शासनाच्या निर्देशानुसार तपासणी करून . त्याला फेर तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य केंद्रात रवाना केले.
डॉ. वाघ यांनी नागरिकांना आव्हान केले आहे. की कोरोना पेशंट भारतात झपाट्याने वाढत आहेत , आणि आपल्या गावात शहरातून आलेल्या ग्रामस्थांनी स्वताःहून प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करावी . नागरिकांनी घरा बाहेर निघू नये , डॉक्टर्स व पोलीस प्रशासनास मदत करा आपले जीवन आपल्याच हातात आहे. स्वतःची काळजी घ्या व हात धूऊनच घरात प्रवेश करा असे आव्हान केले आहे .
तसेच कासोदा हे मोठ्या बाजार पेठेचे गांव असून कासोदा व परिसरातील गावांसाठी तालुक्याच्या ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आली पाहिजे , म्हणून या मागणीला तालुक्यातून उधाण आले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here