<
कासोदा ता. एरंडोल ( सागर शेलार ) दि. २५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कासोदा शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहून पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत सापडला असून गहू , हरभरा , मक्का , बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कापणीवर आलेला गहू , मका , बाजरी , हरबरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले , असून शेतकरी राजा चिंतेत सापडला आहे.
जिल्ह्यामध्ये वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली़.दुपारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक ऊन होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला़.कासोदा शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले़ , थंड वारे वाहू लागले़. कासोदा शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास १५ मिनिटे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला़ असून शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.