कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर न.पा.आणि पोलिस प्रशासन सज्ज

जामनेर-( अभिमान झाल्टे) – नगर पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवर मशिन द्वारे औषध फवारणी मोहीम राबवली जात आहे .
सध्या कोरोना या गंभीर आजाराने जगात सर्वत्र व
राज्य भरात थैमान घातले आहे .
खबरदारी म्हणून आ गिरीश भाऊ महाजन यांनी न पा प्रशासणाला प्रत्येक वार्डात स्वच्छता ठेवण्याचे सुचना केल्या आहेत.
त्याबाबत जितेंद्र पाटील ‘ मुख्याधिकारी राहूल पाटील . नगरसेवक कैलास नरवाडे तसेच आरोग्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शन नुसार न पा कर्मचारी मशिनी द्वारे औषध फवारणी मोहीम राबवत आहेत
नागरिकांनी स्वच्छता राखा .
जमाव करू नका. विनाकारण बाहेर फिरु नका स्वताः सह इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.तसेच सूचनांचे पालन न करणार्याना पोलीस खाकीचा प्रसाद ही मिळत आहे.
फक्त अत्यावश्यक गरजेसाठी प्रशासनाच्या ठरलेल्या वेळेतच घराबाहेर निघा.व आपल्या व इतरांच्या आरोग्याशी खेळू नका. काळजी घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here