कोरोना पासुन बचाव करण्यासाठी जामनेर शहरामध्ये बोहरा परिवाराच्या वतीने केले मास्क सहीत किटचे वाटप

जामनेर-(अभिमान झाल्टे) – शहर व परिसरात समाजाचं दातृत्व म्हणून परिचित असणारा परिवार म्हणजे बोहरा परिवार दोन दिवसाअगोदर त्यांच्याच परिवारातील अनिल बोहरा यांनी शहरात मोफत मास्क वाटप केले. तर आज जामनेर नगरीचे प्रथम लोकनियुक्त नगर अद्यक्ष राजूकाका बोहरा, ईश्वरलाल जैन नागरी पतसंस्थचे चेअरमन कचरूकाका बोहरा तसेच बेस्ट बाजार चे संचालक राहुल बोहरा, शेरू बोहरा यांनी संपूर्ण संचार बंदीत महत्वाचे कार्य करणारे पोलीस, पत्रकार यांना कोरोना पासून बचाव करणेसाठी एक किट तयार करून त्यांचे वाटप केले, आज देशावर एक हात मदतीचा. म्हणुन राजू बोहरा यांनी आवाहन केले आहे .की कुणाला केव्हाही किराणा सामान अन्य वस्तुंची गरज भासल्यास बेस्ट बजार घरी बसल्या मदत करणार .
पण नागरीकांना विनंती की शासनाला व पोलीस प्रशासनाला मदत म्हणुन कोणीही घराच्या बाहेर निघु नये . जेणे करुन आपणास त्रास होणार नाही. अशा प्रकारे सर्वांनी स्वत:ची काळजी घावी.असे आव्हान राजू बोहरा व जामनेर पोलिस स्टेशनचे PI-प्रताप इंगळे साहेब यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here