वर्दीतल्या देवमाणसाला:मास्क,ग्लोज,सॅनिटायझर वाटप

जळगाव – (प्रतिनिधी) – सदरक्षणाय, खलनिग्रहणाय…’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिस करतात.
अश्याच कोरोनारुपी जागतिक खलनायकाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दल अहोरात्र लढतोय. संपुर्ण राज्यात संचारबंदी लागु असल्याने पोलिस दलावर अतिरिक्त ताण येतोत.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरामध्ये हळूहळू वाढताना दिसतोय त्यादृष्टीनं सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेल्या आहेत मात्र हे सगळं करत असताना सगळ्यात जास्त ताण येतो तो म्हणजे पोलिसांवरती पोलिसांना वारंवार नागरिकांच्या संपर्कात राहावं लागतं नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना नेहमीच तत्पर असावे लागते. मात्र हे सगळं करत असताना त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा असतो. हीच बाब लक्षात घेता जळगाव पोलिसांना देवा तुझा मी सोनार संघटनेच्या वतीने ५०० मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
जळगाव पोलीस दलातील एकूण ५ पोलीस ठाण्यांच्या सर्व स्टाफ ,बंदोबस्तावर असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे बंदोबस्तावरती असणारे सर्व कर्मचारी हे मास्क लावूनच बंदोबस्तावर तैनात असताना पाहायला मिळत आहेत.
या मास्क वाटपावेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे,देवा तुझा मी सोनार या संघटनेचे अध्यक्ष किरणशेठ पोतोंडेकर,प्रमोद विसपुते,सुनिल सोनार हे उपस्थित होते.नागरिकांनी देखील वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करावे असं यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकाकडुन सांगण्यात आलं .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here