<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील रायपूर येथे ग्रामस्तरीय समितीमार्फत ग्रामस्थांना कोरोना जनजागृती बाबतचे पत्रके घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. तसेच याबाबत काय काळजी घ्यायला हवी, कोणकोणते उपाय केले पाहिजे. या आजाराची लक्षणे काय आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या सूचनांचे पालन करावे? तसेच बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष माहिती घेऊन सर्दी, ताप, खोकला, स्वास घेण्यास त्रास होणे असे लक्षण जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य तपासणीच्या सूचना करण्यात आल्या. तसेच गर्दी होऊ नये यासाठी देखील लोकांना सूचना करण्यात आल्या. तसेच गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना घरीच राहण्यास सांगितले. ग्रामस्थांनीही घरातच राहावे यासाठी मुख्य रहदारीचा रस्ता बंद करण्यात आला. या कामी ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच ताराबाई भीमसिंग परदेशी, सदस्य आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, ग्रामसेविका श्रीमती पी. ए. पाटील, सदस्य/सचिव रामसिंग जयसिंग परदेशी, सदस्य अंगणवाडी मदतनीस ममता राजेंद्र परदेशी, सदस्य आशा स्वयंसेविका पूनम विजयसिंग परदेशी यांच्यासह उपसरपंच प्रवीण परदेशी, ग्रा.प. कर्मचारी सतीश परदेशी आदींनी परिश्रम घेतले.