<
जळगांव- राज्यातील शिक्षकांचे सर्वस्तरीय प्रश्न शासनामार्फत सोडवण्यासाठी राज्य समन्वय समिती कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार आशिष शेलार साहेब यांच्या दालनातआज ३० रोजी नियोजित राज्यस्तरीय राज्य समन्वय समिती बैठक प्रसंगी उपस्थित राज्य समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुन रावजी साळवे राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, सचिव बाबुराव पवार, जुनी पेन्शन हक्क साठी संघर्ष करणाऱ्या नेत्या संगीता ताई शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, समता शिक्षक संघ राज्याध्यक्ष अरुण जाधव, महाराष्ट्र राज्य उर्दु शिक्षक संघटन राज्याध्यक्ष इलाहुजोदुद्दिन फारुकी,पदवीधर राज्याध्यक्ष मूकेश शिंपले,मागासवर्गीय शिक्षक संघटना राज्याध्यक्ष राजेंद्र म्हसदेकेंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष जयवंतराव दुबे,मुंबई पदवीधर राज्याध्यक्ष मीना पगारे,महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महिला प्रतिनिधी पुष्पाताई मुळे शोभा पवार, सुभाष जिरवणकर, किसनराव घोलप, प्रवी नाताई वाघमारे, आ.नीलाताई पांचाल, सह ३८ शिक्षक संघटनाप्रतिनिधींनी ची यावेळी उपस्थिती होती. काल मंगळवार दिनांक ३० रोजी सर्वप्रथम सकाळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या मलबार हिल शिवनेरी बंगल्यावर जाऊन निवेदन दिले. तद्नंतर आयोजित कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीच्या औषध त्यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, राज्य शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार आशिष शेलार,राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या दालनात निवेदन देण्यात येऊन पोहोचत घेण्यात आली. कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज राज्याच्या राजधानीत दुपारनंतर सत्ताधारी पक्षात विविध आमदार व नगरसेवकांचे इन्कमिंग मुळे बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असल्या कारणाने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री यांच्या दालनात शिष्टमंडळ गेले असता त्यांनी दुपारनंतर अचानक गतिमान वेळापत्रक झाल्याने दूरध्वनीवरून संवाद साधून सर्व प्रश्न समजून घेत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ व व स्वतः उपस्थित राहून सर्व प्रश्न समजून घेऊन सोडवण्यासाठी पुढाकार घेऊअसा शब्द दिला. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री नामदार आदरणीय दिवाकर रावते साहेब यांची भेट घेण्यात येऊन राज्य शासनाच्या इतर पुरस्कार प्रमाणे राज्यशासन आदर्श शिक्षक व जिल्हा परिषद आदर्श शिक्षक व सर्व आदर्श शिक्षकांना एसटी बस सवलत मोफत कुटुंबीयांचे १००% देण्यात यावी या आग्रही भूमिका महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी मांडले असता तात्काळ प्रस्ताव पारित करून आज अनेक विषय व विशेष म्हणजे राज्यातील धनगर समाजाचा महत्त्वाचा विषय मंत्रिमंडळात बराच वेळ विचार केला गेल्यामुळे पुढील टप्प्यात शिक्षकांचे केजी टू पीजी सर्व प्रलंबित प्रश्नविचार करू असे आश्वासन राज्यातील जवळपास सर्वच मंत्रीमहोदयांनी राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर व राज्य समन्वय समितीला दिले. राज्याचे मंत्री नामदार महादेव जानकर यांची देखील किशोर पाटील कुंझरकर सर्व शिष्टमंडळाने यांनी भेट घेऊन चर्चा केली.जुनी पेन्शन योजना लागू करणे केंद्रप्रमुख यांचा मुद्दा पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी चा मुद्दा जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करणे, महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांमधील अनुदान सुरू करण्यासंदर्भात,२५ फेब्रुवारी ते दोन मार्चमधील अधिवेशनातील आश्वासन अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत २००९ नंतर चे महाराष्ट्रातील तेराशे ५८ वर्षे शिक्षक व परिचर यांचे शासन स्तरावरून समायोजन,प्रभावित केंद्रप्रमुख सध्या शासनाने कायमस्वरूपी केंद्र प्रमुख निवडणूक पदोन्नती पद्धत बंद केली आहे, त्यामुळे 50 टक्के केंद्रप्रमुख जागा रिक्त आहेत. शासनाने याबाबत केंद्रप्रमुख यांच्या नेमणुका केल्या आहेत, परंतु त्यांना कायम करून शंभर टक्के पदवीधर प्राथमिक शिक्षक आतून भरण्यात येण्याचा प्रश्न, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाड्यात दिले जात आहेत ते सरसकट राज्यभर देण्यासंदर्भात निर्णय होणे बाबत तसेच राज्यातील राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना पूर्ववत दोन वेतनवाढी सुरू करून इतर शासकीय पुरस्कारा प्रमाणे त्यांना देखील एसटी प्रवास सवलत १००% मोफत कुटुंबियांसह मिळणेबाबत,केंद्रप्रमुख प्रवास भत्ता दिनांक तीन मार्च २०१०रोजी चे शासनाच्या आदेशान्वये प्रवास भत्ता चा प्रश्न असून तो मिळणे बाबत सातवा वेतन आयोग जगातील प्रवास भत्ता संदर्भात होणाऱ्या शिफारशीनुसार नवीन प्रेमाचा आदेशात केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांचा नामोल्लेख करणे बाबत, उर्दू शिक्षक भरती करणेबाबत आदर्श शिक्षकांना सर्व सवलती मिळवून त्यांना त्या-त्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती व राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सदस्य म्हणून घेणे बाबत,पदवीधर आतला ७ वे वेतन आयोगात मिळणारी वेतन श्रेणी कमी असून त्यात दुरुस्ती होणे बाबत, राज्यातील प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख मुख्याध्यापक विस्ताराधिकारी गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांची रिक्त पदे तातडीने भरणे बाबत, संवर्ग एक बदली पदोन्नत्या करताना सर्व जागा खुल्या ठेवण्याचा मुद्दा राज्यशासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना सवलती व इतर तेरा मागण्यांचा मुद्दा या सह १३८ प्रश्नांची निवेदन देण्यात आले व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या संदर्भात शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असा आशावाद राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव राज्यातील सर्वस्तरीय शिक्षकांच्या सर्वस्तरीय प्रश्नांची जाण असलेले अभ्यासू नेतृत्व शिक्षकांची मुलुख मैदान तोफ किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केला .प्रास्ताविक राज्य समन्वय समितीचे राज्याध्यक्ष अर्जुनराव साळवे
सूत्रसंचालन उर्दू शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष इलाहाउद्दीन फारुकी, तर आभार राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी व्यक्त केले.
राज्यातील प्राथमिक शिक्षक पदवीधर-शिक्षक केंद्रप्रमुख व शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी सर्वांच्याच प्रश्नांच्या संदर्भात शासन सकारात्मक असून लवकर सकारात्मक निर्णय येईल असा आशावाद राज्य समन्वय समितीचे किशोर पाटील कुंझरकर व राज्य समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.