वरणगाव येथील किराणा प्रोव्हीजन्सवर प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

वरणगांव – (प्रतिनिधी) – देशावर ओढलेल्या भल्यामोठ्या संकटावर जेथे संपूर्ण देशावर ‘लॉक डाऊन’ व महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. तेथे काही मोठे व्यापारी या देशातील सर्वसामान्य जनतेला लुटून खाण्याची संधी कधीच सोडत नाही हे दिसून येत आहे.
एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गवाही दिली आहे की जनतेने कसलीच परवा न करता घरात रहावे जेणेकरून त्यांची सुरक्षा होईल व संसारोपयोगी तसेच अत्यावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कमी पडू देणार नाही व कसल्याच दुकानात गर्दी करून किंवा लाईन लाऊन सामान भरून भयभित होण्याची गरज नाही.
असे असतांना वरणगावातील बरेच “किराणा प्रोव्हीजन” हे किराणा मालाचे नावलौकिक होलसेल व्यापारी असून जवळजवळ प्रत्येक किराणा मालाचे ते होलसेल व्यापारी आहेत.
असे असताना त्यांनी अचानक त्यांच्याकडील विकले जाणाऱ्या मालावर अव्वाच्या सव्वा किमती वाढविल्या आहेत. कालपर्यत विकला जाणारे सोयाबीन खाद्य तेल 82 रुपये प्रती किलो असतांना ते तब्बल 98-100 रूपये होलसेल भावात विकले जात आहे.
म्हणजे तब्बल 20% भाव वाढ करून जनतेची सर्रास लूट केली जात आहे. त्याचप्रमाणे किराणाच्या दुसऱ्या मालावर सुद्धा भाव वाढ करून ग्राहकांना लूटले जात आहे.

जनतेची फसवणुकीच्या या कारभाराला कुणाचा पाठिंबा आहे? ते त्यांनी जाहीर करावे व यासारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी ते प्रशासनाला मज्जाव करतील का?
तसेच प्रशासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून याची दखल घेईल का? कि नेहमीप्रमाणे धनाढ्य व्यापाऱ्यांना सोडून गरीब दुकानदारांच्या मागे लागून आपल्या अधिकाराचा बिगुल वाजवेल?
पुढीलकाळात कोरोना अगोदर यासारखे रक्त पिपासू व्यापारी ज़र गरीब जनतेचे रक्त पिऊन त्यांना ठार करतील तर गरीबांनी काय करावे?
या अचानक केलेल्या भाव वाढीत लूटमारचे बळी अनेक छोटे व्यापारी वर्गासह गोर गरिब नागरिक आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा जनता कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. असेही अनेक संतप्त नागरिकांमध्ये बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here