<
कासोदा/एरंडोल(प्रतिनिधी)- संपुर्ण देशात सरकार ने लॉकडाऊन केले आहे. कोरोना विषाणू झपाट्याने वाढत आहे. तरी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलीस बांधव, डॉक्टर, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र ग्रामस्थांची सेवा करत आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन जनतेला काठीचा धाक दाखवून घरात बसून राहण्यास विनंती करीत आहेत. तर एकीकडे ग्रामपंचायत व ठेकेदार यांच्याकडून शाळेच्या सरंक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. तर त्यास्थळावरून महिला देखील पाणी भरण्यासाठी ये जा करतांना दिसत आहे. व कासोद्यातून तळई जाणारा रस्त्याचे देखील काम सुरू असून, यात काम करणाऱ्यांना ही साथ लागण होणार नाही का. यामुळे गावातील सुज्ञ नागरिक हैराण झाले आहेत. की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व जळगांव जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश काढले असुनही, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यांनी सरकारच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसते. अशी चर्चा चौका- चौकात सुरू असून ग्रामपंचायत जर आदेशाचे पालन करत नसेल तर जनता कुठून आदेश पाळणार आहे, यात पोलिस प्रशासनावर चिंतेचे सावट पडले आहे. की कारवाई करावी तर कोणावर, लोक घोळकेच्या घोळके करुन ही गम्मत बघत आहे. तर एकीकडे राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हान केले आहे. की प्रशासनास मदत करा व शासनाचे आदेश पाळा जो आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, त्यावर कासोद्यातील जनता म्हणत आहे नागरिकांना १४४ चा धाक दाखवून घरात बसून ठेवत आहेत आणि ग्रामपंचायत मजूर लावून काम करीत आहेत. याकडे शासनासह प्रशासनाने देखील दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.