<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )-कोरोना वायरस चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे मास्क व सैनीटायझरचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाली असून हात मजुरी वाले लोक ते खरेदी करू शकत नाही.
ह्याच पार्श्वभूमीवर दि.२६ मार्च रोजी तालुक्यातील कासोदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.शरद राजपूत , पो.कॉ.जितेश पाटील , पो.कॉ.इम्रान पठाण यांनी संचारबंदीत कर्तव्य बजावत असतांना गावातील जनतेला स्वखर्चाने मास्क चे वाटप केले.
तसेच नुसते मास्क च वाटप केले नसून स्वतःच्या हाताने त्यांना मास्क घातले व घरी राहण्यास सांगितले.घराबाहेर पडू नका , मरणाला आमंत्रण देऊ नका , हात धुवूनच घरात प्रवेश करा अशा सूचना यावेळी त्यांनी गावातील ग्रामस्थांना केल्या.