<
पुणे(प्रतिनीधी)- काल पुण्यात कंपनी मध्ये कामगार म्हणून लहान मोठी काम करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील १५ ते २० मुलामुलींचा ते पुण्यात लॉकडाऊन मधे अडकून पडल्याचा मेसेज व्हायरल झाला होता या सर्वांकडे १ दिवस पुरेल इतकाच शिधा होता त्यामुळे पुढचे २१ दिवस आता कसे निभणार हा गंभीर प्रश्न होता त्यामुळे ती सर्व भयंकर अस्वस्थ होती या सर्वांशी लोकसंघर्ष च्या प्रतिभाताई शिंदे यांनी तातडीने संपर्क साधून त्यांची परिस्थिती समजून घेतली व पुण्यातील खासदार संजय काकडे यांच्याशी संपर्क साधून या सर्वांना अत्यावश्यक मदत पुरवली संजय काकडे यांनी या सर्वांना महिनाभर पुरेल एव्हढा किराणा ज्यात तूरडाळ, तांदूळ, गहुपीठ, तेल, साबण, पेस्ट भाजीपाला, कांदा आदी वस्तू तसेच प्रत्येकी २००० रुपये अशी मदत केली आहे. नाशिक येथेही ४२ आदिवासी तरुण शिधा नसल्याने असेच अडकून पडले होते व ते पायी गावाकडे निघण्याच्या तयारीत होते मात्र त्यांनाही तेथेच थाबण्याचे समजावून नासिक येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन मते, काम्रेड राजू देसले व सचिन भोर यांच्या मदतीने त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरातमध्ये मजुरी साठी गेलेले ७० मजूर ही कुठलाच आसरा नसल्याने तेथून अक्कलकुवा येथे येण्यासाठी पायी निघाले ते ४९ किमी पायी आले रात्री दोन वाजता त्यांनी फोन केल्या नंतर त्यांना तिथेच थांबायला सांगून गुजरात प्रशासनाशी बोलणी करून त्यांनाही गुजरात पोलीस प्रशासनाची मदत घेऊन अक्कलकुव्यात आणले गेले व त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरी पोहचवण्यात आले असून अत्यावश्यक सुरक्षा घेण्याचे सांगितले आहे. तळोदा तालुक्यातील कालिबेली येथील काल्या वसावे हे आपल्या घरातील पेशंट घेवून सुरतला गेले होते अचानक लॉक डाॅवून जाहीर झाल्याने त्यांना तिथे अडकून पडावे लागले तेथील समाजसेवक व आंबेडकरी नेता सुरेश सोनवणे यांच्याशी आम्ही संपर्क साधल्याने त्यांनी त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथील व जळगाव जामोद चे ३६ लोक पाळधी येथे साडीच्या कापडाच्या झोपड्या करून राहतात त्यांच्या बाबत ना.गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना फोन केल्याने त्यांनी त्यांच्या संपूर्ण शिधाची व्यवस्था केली त्यांच्या सोबत लोक संघर्ष मोर्चाचे अनिल माळी यांनी मदत केली. वसई विरार येथे शिकणाऱ्या BAMS मुलींना तेथील साथी प्रमोद साळवे यांनी मदत केली. या सर्व परिस्थितीत लोक संघर्ष मोर्च्याच्या वतीने नंदुरबार व जळगांव जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी, कामगार, मजूर कोणी शहरांमध्ये अडकून पडले असतील तर त्यांनी संपर्क साधावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व प्रशासनाच्या मदतीने त्यांना ते आहेत त्या ठिकाणी अन्न, औषधे, व अत्यावश्यक मदत देण्यात येईल असे आवाहन केले आहे. यासाठी संपर्क- प्रतिभा शिंदे ९७६७४५७०६२, सचिन धांडे ९३२६७३५६३६, निशांत मगरे ८६०५७५१६००, आतिश जगताप ७७७६८५४३१० या क्रमांकांवर संपर्क करावा.