<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोना सारख्या जागतीक संकटात संपुर्ण देशासह जिल्हा लाँक डाऊन असताना जिल्ह्यातील नागरिक देखील या लाँकडाऊन ला प्रतिसाद देत आहेत. असे असताना देखील शहरातील विविध भागात छुप्या मार्गाने देशी व विदेशी दारूची सर्रास विक्री होत आहे. परंतु या दारूचा दर अधिक असल्याने मद्यपींनी हातभट्टीकडे (गावठी दारु) कडे आपला मोर्चा वळवल्याच दिसून येत आहे. या काळात जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गावठी दारु विक्रेते जोमात दारु विकताना दिसून येत आहे. दरम्यान, पोलिसांनी अनेकदा धाडी टाकून आरोपींना जेरबंद केले. तरी दारु विक्रेत्यांवर काहीही एक फरक पडल्याचे दिसून येत नाही. जळगांव शहरासह तालुक्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अंगमेहनतीची कामे करीत असल्याने बहुतेकांना दारूचे व्यसन जडले आहे. या लॉकडाऊन च्या काळात शहरासह तालुक्यात मिळणारी देशी व विदेशी दारूचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मद्यपींनी आता हातभट्टीची दारू पिण्यास सुरवात केली असल्याने, हातभट्टी दारू विक्रेते जोमात दारू विक्री करताना दिसून येत आहे. तरी याकडे ही पोलिसांकडून कारवाई होऊन ही दारू बंद होईल का? अशी सामान्य माणसात चर्चा आहे.