<
विरोदा(किरण पाटील) – फैजपूर पो.स्टे.हद्दीत फैजपूर पोलिस मध्यरात्री गस्त करीत असताना बामणोद शिवारातील सुना सवखेडा मारुती मंदिराजवळील शेताजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्ता, जुगार सुरू असल्याची गुप्त बातमी मिळल्यावरून आज दि.२७ रोजी मध्यरात्री १२:४५ वा. सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला असता झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना आरोपी विनोद प्रभाकर पाटील वय ४४ तापीनगर भुसावळ याच्या जवळून १५०० /- रु रोख पाच हजार रु चा मोबाईल, ७००००० लाख रु ची कार तसेच आरोपी सै.वाहिद सै. रशीद वय ४१ रा.भलोद यांच्या जवळून २५००/- रु रोख व २०००/- रु किंमतीचा मोबाईल, ५००००/- रु किंमतीची एक मोटारसायकल त्याच प्रमाणे आरोपी ब्रिजलाल राजाराम कोळी वय ४२ रा.म्हैसवाडी याचे जवळून १७००/- रु रोख ३००० /- रु किंमतीचा मोबाईल या सह आठ आरोपींना अटक करण्यात आली. सदर ए. पी.आय. प्रकाश वानखडे, ए.एस.आय. विजय पाचपोळ, स.फौ.अंबादास पाथरवट, पो.ना. उमेश चौधरी, पोलीस हे.का.उमेश पाटील, पो.का. प्रशांत चिरमाडे यांनी छापा टाकून आरोपींना मुद्देमाला सह अटक करण्यात आली. सदरील आरोपींनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. सदर पो.ना. उमेश चौधरी यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरुध्द फैजपूर पो.स्टे. भाग ६ गुरनं २३/२०२० भा.द.वी.क. १८८,२७७ सह मुंबई जुगार कायदा कलम १२(अ)प्रमाणे कारवाई केली असून त्यांचेकडून एकूण रक्कम रुपये ९,१३,९०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.