Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नागरीकांनी बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी जावू नये – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 27 –  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी सकाळच्यावेळी नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत बाजार समितीतून नागरीकांना किरकोळ भाजीपाला मिळणार नसल्याने त्यांनी बाजार समितीत जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

          जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीतील व्यापाऱ्यांची  बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस बाजार समितीचे सभापती कैलास बोरसे, सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महानगरपालिका आयुक्त्‍ सुशील कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, उपनिबंधक सहकारी संस्था मेघराज राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

          कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशभरात    लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत सकाळच्यावेळी नागरीक किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा उद्देश सफल होण्यात अडचणी निर्माण होत आहे. नागरीकांना जीवनाश्यक वस्तु, भाजीपाला, फळे त्यांचा परिसरातच उपलब्ध होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असूनही जे नागरीक बाजार समितीत किरकोळ खरेदीसाठी जातील. त्यांची वाहने अडविण्यात येईल. तसेच त्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले. त्याचबरोबर बाजार समितीती अधिकृत हमाल  कामावर आले पाहिजे यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तसेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था बाजार समितीने करावी. बाजार समितीत दुचाकी वाहने येणार नाही याची काळजी घ्यावी. महानगरपालिका क्षेत्रात भाजीपाला व फळविक्रेत्यांनी त्यांना नेमूण दिलेल्या वॉर्डात विक्री करावी.

दुपारी 12 ते 5 यावेळेतच माल उतरविण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय

       शहरातील दाणा बाजार परिसरात नागरीकांची होणारी गर्दी लक्षात घेता यावर उपाय म्हणून दाणा बाजारातील घाऊक व्यापाऱ्यांची वाहने दुपारी 12 ते 5 यावेळेतच आपला माल उतरवतील असा महत्वपूर्ण निर्णस आज व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. दाणा बाजारात होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केले असता व्यापारी असोसिएशनने निर्णय घेतला. त्याचबरोबर घाऊक व्यापाऱ्यांनी नागरीकांना माल न विकता तो किरकोळ व्यापाऱ्यांना विकावा. तसेच किरकोळ व घाऊक विक्रीच्या दुकानांची वेळ वेगवेगळी असावी आदि विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेण्यासाठी येणाऱ्या रिक्षा रस्त्यावर उभ्या राहणार नाहीत. दाणा बाजारात अनावश्यक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासनही व्यापाऱ्यांनी या बैठकीत दिले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी यांनी कृषि उत्पन्न बाजार समितीस भेट देवून तेथील परिस्थितीची पाहणी केली. तसेच होणारी गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सुचना केल्यात. यावेळी त्यांच्या समवेत सहायक पोलीस अधिक्षक नीलभ रोहण, महापालिका आयुक्त सुशील कुलकर्णी आदि उपस्थित होते.

नागरीकांनी गर्दी टाळण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

       जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. परंतु नागरीकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. अशा बिकट परिस्थितीत नागरीकांनी संयम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. अनावश्यक वस्तुंची खरेदी टाळली पाहिजे. विनाकारण प्रवास करु नये.  जेणेकरुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आपण यशस्वी होवू. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगाव जिल्हावासियांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्रातील पत्रकारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे -वसंतराव मुंडे

Next Post

अनुदानीत देयके 30 मार्च पर्यंतच स्विकारले जातील लेखा व कोषागागे विभागाकडून सूचना

Next Post
अनुदानीत देयके 30 मार्च पर्यंतच स्विकारले जातील लेखा व कोषागागे विभागाकडून सूचना

अनुदानीत देयके 30 मार्च पर्यंतच स्विकारले जातील लेखा व कोषागागे विभागाकडून सूचना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d