<
तांदुळवाडी (ता.भडगांव) – येथे ग्रामपंचायतीने व गावातील ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.
सध्या जगभरात कोरोना व्हायरस ने लोकांची झोप उडाली आहे, या कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असून त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना व संसर्ग जन्य रोगाच्या प्रादूर्भावापासून तांदुळवाडी ग्रामपंचयातीने निर्जंतुकीकरण फवारणीसाठी फॉर्मलडीहाईटर १०% सोल्युशन ची फवारणी करून सुरुवातीस ग्रामपंचायत व श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. त्या फवारणीसाठी काही गावचे आदर्श असणारे माण्यवर व्यक्ती यांनी मोठे ट्रॅक्टर द्वारे व टँकर पाण्याने भरलेले त्या खाली ट्रॅक्टर मध्ये २०० लिटर ची टाकी ठेऊन पाण्यामध्ये ४ लिटर सोल्युशन, फिनायल, सॅनिटाइझर अशा औषधी मिसळून तांदुळवाडी ग्रामपंचायतीने स्वखर्चाने व ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर मालक नानासाहेब पाटील व दिनेश पाटील यांचा हादभार म्हणून टँकर ची मदत देण्यात आली. त्यात ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, लक्ष्मीबाई गायकवाड(सरपंच), साधनाताई पाटील(उपसरपंच), किरण बागुल(पोलीस पाटील), पांडे मॅडम (ग्रामसेविका), ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, यांनी आपआपल्या घरातील पंपाच्या सहाय्याने सॅनिटाइझर पाण्यात मिसळून लोकांपर्यंत संदेश पोहोचवला, व गावातील ग्रामस्थांनी व नवतरुणांनी या भयंकर कोरोना व्हायरस विषाणू चे थैमान असतांना देखील जीवाची पर्वा न करता कान्याकोर्या पर्यंत गल्लोगल्लीत संदेश देऊन फवारणी साठी मोठे अनमोल सहकार्य लाभले आहे.