<
मुख्यमंत्र्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची मागणी.
मुंबई ( प्रतिनिधी) – केंद्र सरकारने कोरोनाचा संसंर्ग रोखण्यासाठी 21 दिवसाची संचारबंदी लागू केल्याने सर्व उद्योग,व्यवसाय बंद आहेत. पहिल्यादांच मोठी,छोटी वृत्तपत्रांची छपाईच बंदही झाल्याने यावर अवलंबून असलेल्या घटकांना अर्थीक फटाका बसला आहे.त्यामुळे सरकारने इतर घटका प्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रालाही विशेष मदत करुन व पत्रकारांना अर्थीक संरक्षण द्यावे.अशी मागणी मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.सरकार काय निर्णय घेते याकडे माध्यम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी योग्य आणि कडक उपायोजना केल्यामुळे कोरोना साथीचा प्रदुर्भाव नियंत्रित करण्यात यंत्रणा यशस्वी होत आहे.तर केंद्र सरकारने कोरोना साथीच्या संचारबंदी काळात सर्वसामान्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. राज्य सरकारनेही अनेक वंचित घटकांना मदत करण्यासाठी आश्वस्त केले ते स्वागतार्ह आहे. संचार बंदीच्या काळात पोलीस, आरोग्य सेवक आणि प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी हे तीन घटक जीव धोक्यात घालून काम करत आहेत. या साथ रोगाला नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यात सरकारी यंत्रणे बरोबर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीव धोक्यात घालून संवेदनशील भागात जाऊन वार्तांकन करत आहेत. त्यामुळे सरकारला आणि प्रशासकीय यंत्रणेला योग्यती परिस्थिती समजण्यास व हाताळण्यास दिशा मिळत आहे. अनेक ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी संचार बंदीच्या काळात रस्त्यावर आलेल्या पत्रकारांना पोलिसांची नजरचुकीने मारहाण देखील सहन करावी लागत आहे. तरी ही राष्ट्रीय आपत्तीत पत्रकार बांधव आपले कर्तव्य पार पाडत आहेत.मोठ्या वर्तमानपत्रांसह जिल्हास्तरावरील सर्व लघु वृत्तपत्रे संचारबंदीच्या काळात छपाईसह वितरण बंद झालेले आहे. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील आर्थिक संकट कोसळले आहे. तर ग्रामीण भागात व शहरात वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, दूरचित्रवाहिन्यांचे वार्ताहर हे नाममात्र मानधनावर काम करतात.त्यांनाही या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.दुसरीकडे जिल्हा स्तरावरील लघु वृत्तपत्रांची छपाई बंद असल्याने संपादक आणि वृत्तपत्रसृष्टीचे मालकांनाही आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आली आहे . साथ रोगाच्या कठीण काळात राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या माध्यमांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे, त्यामुळे लघु वृत्तपत्र,पत्रकार, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी,वितरक यांना केंद्र आणि राज्य सरकारने विशेष मदत करावी अशी मागणी राज्यभरातुन होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही मागणी करत असुन सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदरच्या निवेदनावर, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे, वृत्तवाहिनी प्रदेशाध्यक्ष मनिष केत, कार्याध्यक्ष राकेश ट्योळे,किरण जोशी यांच्या स्वाक्षरी आहेत.
संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव व मंञालयातील मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना ईमेल द्वारे माहिती पाठवली आहे.