<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – भारतात संसर्गजन्य साथरोग कोरोना विषाणूने थैमान घातले आहे . यासाठी भारतात २१ दिवसाचा लॉक डाउन ठेवण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी सुरू आहे . यासाठी केंद्र सरकार व राज्यसरकार , शासन आणि पोलीस प्रशासना सह वैद्यकीय अधिकारी नागरिकांना घरात थांबण्याची विनंती करीत आहेत. परंतु लोकांना ते सांगूनही समजत नाही व बाहेरच निघत आहेत म्हणून , पोलीस प्रशासनाची व शासनाची अत्यावश्यक काळात मदत करण्यासाठी विना मोबदला व स्वखर्चाने कासोद्यातील माजी सैनिक गोविंदा बागुल एरंडोल आगार प्रमुख , यांच्यासोबत हभप संजय महाराज जमादार ( सर ) , स्वप्निल बियाणी , हरिष पटेल , मनोज पिंगळे , उमेश नवाल , गोविंद चौधरी , पत्रकार सागर शेलार , पत्रकार राहुल मराठे , पत्रकार शैलेश मंत्री , शैलेश पांडे , गोविंद अग्रवाल , पवन राजपूत हे पोलीस प्रशासनाची कमतरता आहे म्हणून दक्षता समितीतील सदस्य म्हणुन पुढे आले आहेत. यासाठी एरंडोल येथील तहसीलदार सौ.अर्चना खेतमाळीस यांच्या सही व शिक्यासह आयकार्ड तयार करून मिळाले आहे , सर्वाना त्या आयकार्ड ची वाटप कासोदा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि रविंद्र जाधव यांच्या व सरपंच पुत्र भैय्यासाहेब राक्षे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी पीएसआय नरेश ठाकरे , पो.कॉ.दिपक आहिरे पो.स्टे.चे सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य , व कर्मचारी पत्रकार उपस्थित होते. …
अत्यावश्यक सेवा परवाना पत्रात कोरोना दक्षता समितीतील सदस्यांनी आज अत्यावश्यक सेवा पुरविण्याऱ्या सर्व किराणा दुकान , दवाखाने , मेडिकल , दूध डेअरी , कड धान्य दुकान यांच्या कडे येणाऱ्या नागरिकांना माल घेतेवेळी अंतर असावा म्हणून शोषल डिस्टन साठी ग्रामपंचायत सरपंच सौ. मंगलाबाई राक्षे व सरपंच पुत्र भैय्या राक्षे यांनी व्हाईट कलर घेऊन दिले व सोबत मदतीसाठी ग्राम पंचायतचे कर्मचारी नेमून दिले , दक्षता समिती व ग्रामपंचायत कर्मचारी सदस्यांनी वाटणी करून आप आपल्या वार्डात येणाऱ्या वरील सर्व दुकानां समोर सर्कल आखून दिले , यासाठी नितीन शितोळे , विजय चौधरी , सुभाष पाटील, यशवंत राक्षे , विलास पाटील , तुषार मोरे , संदिप राक्षे , दिपक शिंपी सह सर्व नागरिक व दुकानदारांनी सहकार्य केले .