<
एरंडोल(प्रतिनिधी)- येथील तिघांवर जमावबंदीचे उल्लंघन व शांततेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दि.२९ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एरंडोल येथील बस स्टँड जवळ असलेल्या अंड्याच्या गाडीवर दिपक अर्जुन महाजन (वय २९) कैलास भास्कर पाटील (वय ४२) हे दोघे व सकाळी १० वाजेच्या सुमारास संतोष पांडुरंग जगताप (वय ४२) यांने एरंडोल नगर पालिका या ठिकाणी जमावबंदी आदेश असतांना देखील व चेहऱ्यावर मास्क न लावता उभे असतांना व सार्वजनिक ठिकाणी जोरजोरात ओरडुन शांततेचा भंग केल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी ताब्यात घेतले व त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.