<
कासोदा(प्रतिनिधी)- कासोदा शहरातील सरकारी दवाखान्याच्या मागे सरकारी उर्दू शाळेचे काम सुरू असून तेथील एक नव्हे अनेक मजुरांचा ताफा दिसून आला, तरी कासोदा येथील सदरची कामाची व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा पुरावा असून एरंडोल तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः भेट दिली, पाहणी केली व गावात सूचना दिल्या की जास्त गर्दी करू नये. तरी देखील यांचे कामावर १०-१२ मजूर घेऊन काम सुरु आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही वाळू गटाचा लिलाव झालेला नाही तरी प्रांतधिकारी यांनी ही वाळू कुठून आणली हे एक शब्द न विचारता कसली ही कार्यवाही व पंचनामा न करता तेथून पाहणी करून पुढील कोरोना आजाराची जनजागृती साठी गावात तोंडाला मास्क न लावता तसेच लोकांना उपदेश दिले. तरी संबंधित ठेकेदारावर व सरकारी आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल का अशी सामान्य जनतेत चर्चा आहे.