Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 7 वाजेनंतरही इंधन मिळणार – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 30 – जिल्ह्यात सध्या केळीचा हंगाम सुरु आहे. जिल्ह्याच्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर व इतर भागातून मोठ्या प्रमाणात परराज्यात केळी पाठविण्यात येते. त्यांना इंधनाची अडचण येवू नये. याकरीता अशा वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी सांयकाळी 7 वाजेनंतरही इंधन उपलब्ध करुन द्यावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.

            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. 

            जिल्ह्यात सध्या इतर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. अशा नागरीकांची  एकाच ठिकाणी गर्दी होवू नये याकरीता त्यांना एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. त्यांना चहा, पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवण व आंघोळीची व्यवस्था करावी. अशा नागरीकांची संख्या अमळनेर, मुक्ताईनगर व चाळीसगाव तालुक्यात मोठ्या संख्येने असल्याने याची संबंधित नोडल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

            जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर ओपीडी करत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरीकांची संख्या वाढली आहे. याबाबत आयमाला पत्र द्यावे तसेच नर्सिग स्टॉफ कामावर येत नसल्याने तसे नर्सिंग फेडरेशनला कळवावे. त्याचबरोबर निमालाही कळविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्यात.

            शहरी व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर वितरणाच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात सर्वांना पेट्रोल देण्याचे तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल वितरण करण्याचे आदेश आहे. असे असूनही काही ठिकाणी नागरीकांची अडवणूक केली जात आहे. तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली काही नागरीक पेट्रोल मिळण्यासाठी आग्रही असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांना सेवा करण्याची इच्छा असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात आपली सेवा देता येईल. शहरात अनेक भागात सकाळी व संध्याकाळी नागरीक फिरण्यास जातात. अशा नागरीकांनी मुख्य रस्त्यांवर एकत्रित फिरु नये. सध्या अनेक भागात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत सर्व्हेक्षण सुरु आहे. सर्व्हेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने मास्क व सॅनेटायझर पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.

            जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून एका संशयिताचा मृत्यु झाला आहे. याच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन घराबाहेर पडू नये. आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी. असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर पोलिसांनी गारखेडा येथे गावठी दारुची हातभट्टी केली उद्धवस्त

Next Post

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व वायरलेस यंत्रणा सज्ज आंतर जिल्हा व आंतर राज्य सीमा सील

Next Post
कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व वायरलेस यंत्रणा सज्ज आंतर जिल्हा व आंतर राज्य सीमा सील

कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल व वायरलेस यंत्रणा सज्ज आंतर जिल्हा व आंतर राज्य सीमा सील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo