जळगाव : शहरातील उद्योजक नरेंद्र जाधव यांनी लॉक डाऊनच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या 21 गरजू कुटुंबाना किराणा सामान घेण्यासाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
शहरातील अत्यंत गरजू आणि मजुरी करणाऱ्या कुटुंबातील नागरिकांना प्रत्येकी १ हजार रुपयांची मदत नरेंद्र जाधव यांनी केली आहे. किराणा माल देण्याबाबतचे पत्र जिल्ह्यापेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक राजेश जाधव ,युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया , प्रभाकर खर्चे , जगन जाधव , कुणाल जाधव , उमाकांत जाधव, पियुष तिवारी, राहुल चव्हाण, पियुष हसवाल, उपस्थित होते..