एरंडोल(प्रतिनिधी)- राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच जिल्हा परिषद व तालुका शिक्षण विभागाच्या पत्रकान्वये एरंडोल तालुक्यातील आदिवासी वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर या ठिकाणी पटावरील २९ विद्यार्थ्यांना समप्रमाणात त्यांचे पालकांना शिल्लक तांदूळ डाळी व धान्य आदी मालाचे वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स अंतर ठेवून पटावरील २९ पालकांना शिल्लक साठा समप्रमाणात वाटण्यात आला. यावेळी सीमा सोनवणे, रेखा भिल, अनिता पवार, राकेश माळी, मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर आदींनी परिश्रम घेतले.