कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार )- राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार तसेच जिल्हा परिषद व तालुका शिक्षण विभागाच्या पत्रकान्वये एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ या ठिकाणी पटावरील ९३ विद्यार्थ्यां चे समप्रमाणात त्यांचे पालकांना शिल्लक तांदूळ डाळी व धान्य आदी मालाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बी एस अकलाडे यांच्या ३० मार्च च्या आदेशाचे व एरंडोल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांचे पत्राची अंमलबजावणी दिनांक १ एप्रिल २०२० रोजी मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप क्षिरसागर , पत्रकार राहुल मराठे , कार्यकर्ते अनिल शेलार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते सोशल डिस्टन्स अंतर ठेवून विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना डाळी , तांदुळ , आधी धान्य वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सरदार सर यांनी कोरोना विषानुवर मात करण्यासाठी स्वछतेचा संदेश दिला , व शोषल डिस्टन विषयी माहिती दिली व विध्यार्थ्यांना व पालकांना घरी राहण्या बाबत सूचना केल्या , त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलिप क्षिरसागर , उपाध्यक्ष , सदस्य , पत्रकार राहुल मराठे , अनिल शेलार , शाळेचे उपशिक्षक हिम्मत महाजन , उपशिक्षिका , स्मिता पाटील मॅडम , स्वयंपाकिंन मनिषा शेलार , विध्यार्थी व पालक उपस्थित होते.