विरोदा(किरण पाटील)- कासवा येथे आज रोजी सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास तापी नदीच्या किनारी बाभुळीच्या झुडपात हातभट्टी लावून एक हजार रुपये किमतीची हातभट्टीची २० लिटर तयार दारू, तसेच ७ हजार ५०० रुपये किमतीचे पत्र्याच्या टाकीत गुळ, मोह मिश्रित कच्चे रसायन सुमारे १५० लिटर मिळून आले. असा एकूण १३ हजार ५०० रुपये किमतीचा माल हस्तगत केला. आरोपी वासुदेव धना सपकाळे रा.कासवा हा दारू गाडीत नेत असताना पोलिसांना पाहून पळून गेला. पो.कॉ.किरण चाटे यांचे फिर्यादीवरून आरोपी वासुदेव धना सपकाळे याच्याविरुद्ध गुन्हा र.नं १६/२०२० पोव्ही.अक्ट कलम ६५ (फ) (ब) (ई) भादवी क,१८८,२७० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए.पी.आय. प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ.गोकुळ तायडे करीत आहे.