भडगांव – (प्रमोद सोनवणे) – दि.3/04/2020 रोजी शहरात बाळद रस्त्या वरील काँलनी भागात व रात्री ठिक 9: 30 वा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई कामगार ,आरोग्य विभाग, पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांनी भडगांव पाचोरा रोडवर दुतर्फा फवारणी करत आपले कर्तव्य बजावले आहे. सर्वत्र संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले असुन शहरातील प्रत्येक गल्लीबोळात सँनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे, ज्या गल्ली बोळमध्ये पंप जात नसेल त्या ठिकाणी नगरपालिका कर्मचार्यांना पाठीवर फवारणी पंप देऊन फवारणी केली जात आहे सर्व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत ही उलेख्खनिय बाब आहे. नगरपरिषदेच्या अग्निशामक वाहनाने ही फवारणी होत असून हायवे लगत असणारी दुकाने,पेट्रोलपंप त्यांचा संपुर्ण आवारातही फवारणी केली जात आहे.