भडगाव(प्रमोद सोनवणे)- कोरोनाशी लढा देण्यासाठी सारा देश सज्ज झालाय. या जागतिक संकटाला भारतातून नाहीसा करण्यासाठी भारत सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. तसेच राज्यात देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत. तर व्यक्तीचा बळीही गेला. मात्र असं असताना अजूनही नागरिकांमध्ये निष्काळजीपणा दिसतोय. हाच हलगर्जीपणा जीवावर बेतेल याचं भानदेखील त्यांना नाही. अशीच परिस्थिती आज भडगावात नॅशनल बँकामध्ये झाली असल्याची दिसून आले. येथील नागरिकांनी सोशल डिस्टेन्सिंगकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. व ही गर्दी वाढत असतानाही बँक प्रशासन मात्र ढिम्मच बसून होते. तसेच येथील बँकानी सोशल डिस्टेन्सिंगच्या कोणत्याही उपाययोजना केल्याचे चित्र दिसून आले नाही. कोरोना सारख्या महामारीचा प्रसार होऊ नये म्हणुन सोशल डिस्टेन्सिंग हा एकमेव उपाय असतांना देखील भडगावातील स्टेट बँक आँफ इंडिया, बँक आँफ बडोदा, आय.डी.बी. आय बँक यांच्याकडून सोशल डिस्टेन्सिंगची पायमल्ली झाल्याचे दिसून आले व बँकेसमोर तोबा गर्दी दिसुन आली.
स्टेट बँकेत तर सोशल डिस्टेन्सिंगचे कोणतेही एक मीटर मार्कींग चे अंतर दिसले नाही, याचा अर्थ बँकेचे शाखा व्यवस्थापक गाभीर्याने घेत नाही तर ते स्वताची काळजी घेतानाच जास्त दिसून आले. या शाखेमध्ये कर्मचारी व्यतिरिक्त दोन C S P नेमलेले होते. ज्या C S P नी त्यांच्या नेमलेल्या ठिकाणी काम करून सेवा दिली पाहीजे म्हणजे लोक शहरात येणार नाहीत, पण तसे न होता हे C S P मात्र बँक शाखेत बसून होते. तर या C S P ना शाखेत बसण्याची परवानगी शाखा व्यवस्थापकानी कधी पासुन दीली आहे? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
C S P यांना पैसे काढणे व टाकण्यासाठी बँक पैसे पुरवते का ? असा देखील प्रश्न निर्माण होतो ? का C S P ना R B O जळगांव यांचा वरद हस्तं आहे का ? तरी या सर्व बाबींची काळजी घेता ज्या त्या ठिकाणी C S P ना काम करू द्यावे, तसेच सोशल डिस्टेंन्सिगचे भान ठेवुन गाभीर्याने शाखा व्यवस्थापक यांनी लक्ष द्यावे. तसेच तिघही बँकचे व्यवस्थापक शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणार असे आम्ही समजतो व पालन न केल्यास तसेच कोरोना विषाणूची परिस्थिती चिघळल्यास यास बँक व्यवस्थापक जबाबदार राहणार असे जनसामान्यांचे म्हणणे आहे.