<
विरोदा(प्रतिनिधी)- सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत. वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत. साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता ३० ते ४० रुपये ला मिळू लागले आहेत. आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला मास्क वापरने खर्चिक वाटत होती. सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी स्वखर्चाने शहरातील २००० नागरिकांना मास्क उपलब्द करून दिले. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व निलेश राणे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आहे. व कोरोना विषाणूंची लागण बाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी गोटू भारंबे, वैभव वकारेे, पवन सराफ, हिमांशु राणे, विशाल चौधरी, भैया पाटिल, पिंटू भाऊ मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.