<
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 889 वाहनांना मॅन्युअली पासचे वितरण
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 4 – लॉकडाऊनच्या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तु वेळेत पोहोच होणे आवश्यक असते. यासाठी अत्यावश्यक सेवा पुरविणा-या वाहनांना रस्त्यावरून मालाची ने-आण करण्यासाठी पासेस आवश्यक असतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्याही गोष्टींची अडचण उद्भवू नये. याकरिता जळगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविणा-या 889 वाहनांना मॅन्युअली पासेस देण्यात आले आहेत. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली आहे.
यासाठी आतापर्यंत या वाहनचालकांना पासेससाठी कार्यालयात यावे लागत होते. त्यामुळे कालापव्यय होऊन नागरिकांना जीवनावश्यक वस्तु पोहोचण्यासही उशीर होत होता.
कोरोना विषाणूचा वाढता फैलाव लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये. त्यांना लागणा-या जीवनावश्यक वस्तू वेळेत मिळाव्यात यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून जीवनावश्यक सेवा पुरविणा-या वाहनचालकांना आवश्यक असणारा पास आॅनलाईन देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी आज (5 एप्रिल) पासून करण्यात येणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घरबसल्या ई-पास मिळणार असल्याने या वाहनचालकांचा वेळ, पैसा व श्रम तर वाचणारच आहे. शिवाय घरबसल्या ऑनलाईन ई पास मिळाल्यामुळे त्यांना त्वरीत मागणीनुसार जेथे पाहिजे तेथे माल पोहोच करता येणार आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनचालकांना ई पास संबंधी कागदपत्रे ऑनलाईनच परिवहन विभागाला सादर करावी लागतील. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांचे व्हेरिफिेकेशन झाल्यानंतर लागलीच त्यांच्या ईमेलवर ई-पास मिळणार आहे.
अशी आहे ई पास मिळविण्यासाठी पद्धत
वाहनचालकांनी परिवहन विभागाच्या https://transport.maharashta. gov.in या साईट ला भेट द्यावी. नंतर Apply for e pass या ऑप्शन्सवर जाऊन goods vehicle select करावे, नंतर RTO where to apply ठिकाणी एमएच- 19 (जळगाव) सिलेक्ट करावे. वाहन मालकाचे नाव नोंदवावे. वाहन चालकाचे (driver) नाव नोंदवावे. वाहन चालकाचा वैध लायसन्स क्रमांक नोंदवावा. वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालक /मालक) व ई-मेल आय.डी., वाहन क्रमांक नोंदवावे. वाहनाचे चेसिस क्रमांकांचे शेवटचे 5 आकडे द्यावेत. वाहनाचा प्रकार नोंदवावा.
कोणत्या प्रकारचा माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा. Vegetable /grain/groceries ) माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. जळगाव ते मुंबई आदी). ई-पास कालावधी नमूद करावा. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा (दिलेल्या तारखेमधून निवडावा).
Word verification character भरून ऍप्लिकेशन सबमिट करावे. ई-पाससाठी application reference number generate होईल. उपरोक्त अँप्लिकेशन क्रमांक नुसार परिवहन कार्यालयाने अॅप्रुव्हल केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई पास जनरेट होईल. तो “पीडीएफ’ स्वरूपात अर्जदाराच्या मेल “आयडी’ वर पाठवण्यात येईल. त्याची अर्जदाराने प्रिंट काढून घ्यावी.
अधिक माहितीसाठी जळगाव परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257/2261819 किंवा Email [email protected]
यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.