<
फैजपुर(किरण पाटील)- अज्ञात भामट्यानी विरोदे -हंबर्डी येथे शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाच्या गंज्जीला आग लावून पेटवून देण्याचे प्रकार घडल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अज्ञात भामट्याने गव्हाच्या गंज्जीला आग लावून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. शेतकरी अर्धपोटी उपाशी राहून रात्रंदिवस शेतात काबाडकष्ट करीत असतो. रात्रीही शेतात जाऊन पिकांना पाणी देत असतो. ऐन तोंडाची घास आल्यावर मजुरांकडून गव्हाची कापणी करून घेतात. एकत्रित जमा करून दुसऱ्या दिवशी मळणी करण्याच्या उद्देशाने गव्हाची गंजी मारून घेत असतो. शेतकरी शेतातून घरी आल्यावर रात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात भामटे, समाज कंटक त्यास आग लावून देण्याचे प्रकार करतात. अशी घटना विरोदे,हंबर्डी येथे नुकतेच घडली आहे. निसर्ग साथ देत नाही, शेतकऱ्याची विकट परिस्थितीत अज्ञात भामटे शेतकऱ्याच्या शेतातील वारंवार नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दिनांक ३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांनी हंबर्डी येथील शेतकरी प्रमोद सुधाकर पाटील यांच्या सव्वा बिघ्यांमधील गव्हाची गंज्जी पेटून दिली होती. त्यात शेतकऱ्याचे २६ ते २८ हजाराचे नुकसानास अज्ञात बामटा कारणीभूत ठरला आहे. त्याचप्रमाणे विरोदे येथे दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान शेतकरी भास्कर कौतिक चौधरी यांचे शेत खेडने गहू पेरण्यासाठी शेतकरी प्रमोद दपाळू चौधरी यांनी अडीच बिघ्यांमध्ये गहू पेरला होता. अज्ञात भामट्याने आग लावून ३८ ते ४० हजारांचे नुकसान केले आहे. या शेतकऱ्यांच्या गव्हाच्या गंज्जीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नुकसान केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षी आमोदा, बामणोद शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील कडब्यांच्या बुडाला आग लावून पेटवून दिले होते. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना अशी शेतकऱ्यांची बिकट स्थिती अश्या घटनांमुळे निर्माण होत आहे. प्रशासनाने यात लक्ष्य घालून बळीराज्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी भावना जनसामान्यत निर्माण झाली आहे.