<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी शुक्रवारी संवाद साधला.यावेळी त्यांनी कोरोना विरुद्ध लढण्यासाठी एकजुटीने सरकारचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर कासोदा गावासह तालुक्याच्या ठीक -ठिकाणी गावातील प्रत्येक कुटुंबाने तसेच राजकिय सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील आपल्या गॅलरीत,ओट्यावर,दरवाजा शेजारी दि.५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील सगळे दिवे बंद करून फक्त मेणबत्ती , दिवे , मोबाईलचा टॉर्च , बॅटरीचा प्रकाश करून यातून दिव्य शक्तीचा जागर केला. कोरोना व्हायरसच्या या प्रादुर्भावामुळे जो अंधकार देशात पसरला आहे , त्याचा सर्वांनीच एकजुटीने प्रतिकार करत या अंधकारावर एकजुटीच्या प्रकाशाने मात करायची आहे.असा अतिशय महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश त्यांनी दिला आहे. त्यावेळी लोकांनी भारत माता कि जय , वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. दरम्यान काही अतिउत्साही चाहत्यांनी भांड्यांचा गजर तसेच फटाकेबाजी देखील केली.