<
जळगाव(प्रतिनिधी)- शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व ज्युनियर कॉलेज कडून कोरोना विषाणूपासून बचाव व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.जे. आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखालील शाळेतील व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून कोरोना जागृती संदेश सर्व शिक्षकांच्या साह्याने देण्यात आला. त्यात विद्यार्थी पालकांनी कोणत्या कृती कराव्यात त्याचप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे याबद्दल संस्था व शाळेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी डिजिटल मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून त्यांना रोजचा अभ्यासक्रम वेगवेगळे मार्गदर्शन साइट्स तसेच कोणत्या छंद जोपासावे यांचे उपक्रम सांगण्यात येतात त्याचप्रमाणे आहार विषयक मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमात मुख्याध्यापिका सौ. जे.आर. गोसावी, उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर, व उपचिटणीस एच.डी. खडके, पर्यवेक्षक एच. जी. काळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पंडितराव कोल्हे, सचिव अवधूत पाटील सह संचालक मंडळाने कौतुक केले आहे.