<
जळगांव-(प्रतिनिधी) – येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी कोरोना संशयित तीन महिला रुग्णांचा सायंकाळी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिन्ही रुग्णांचे मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. तसेच तिन्ही रुग्णांचे स्वँब रिपोर्ट येणे बाकी आहेत. या तीन महिला वयस्कर असून एक महिला मध्यप्रदेशातील तर दोन महिला जळगांव शहरातील आहेत. या बाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ खैरे दुजोरा दिला आहे. या दोन दिवसात घडलेल्या घटनेने जळगांव करांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र शनिवारी मृत दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जळगांवकराना दिलासा मिळाला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना कक्षात सोमवार दि. 6 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तीन कोरोना संशयित महिला रुग्णांचा दुपारी 2 वाजता, 6. 45 वाजता तर तिसऱ्या महिलेचाही सायंकाळी मृत्यू झाला आहे. मृत झालेल्या तीन संशयीतांमध्ये एक महिला जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील 65 वर्षीय तर दुसरी महिला मध्यप्रदेशातील दुर्धर आजार व निमोनियाने ग्रस्त होती. एक महिला चिरायू हॉस्पिटलमध्ये सिरीयस होती जिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मात्र तिन्ही महिला रुग्णांचा स्वँब रिपोर्ट येणे बाकी आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांचेशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर जळगांव करांनी घराबाहेर न पडता घरातच राहणे व सोशल डिस्टन्ससिंग ठेवणे हिताचे आहे.
आतातरी जळगांव करांनो वेळीच सावध व्हा व घराबाहेर पडल्यास आपला शत्रू म्हणजेच कोरोना आपली वाट पाहत आहे, याची सामाजिक जाणीव व भान ठेवावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फ़े करण्यात आले आहे.