<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ना नफा ना तोटा या तत्त्वावर फळे व भाजीपाला अशा सुरक्षित बाजार या उपक्रमाचे आयोजन गेल्या चार वर्षापासून जळगाव रनर्स ग्रुप जळगाव शहरात नियमित व्यायाम तसेच रनींगबाबत जळगाव शहरामध्ये जनजागृती करत आहे यावर्षी कोरोणा आजारामुळे शेतकऱ्यांवर जे संकट कोसळले आहे त्यावर मात म्हणून जळगाव जिल्ह्यातील जे शेतकरी भाजीपाला व फळे अशी पीके साधारण आठ दिवसात काढून बाजारात नेण्यायोग्य असतात अशा पिकांचा शेतकऱ्यांना मोबदला मिळावा व त्यांचेआर्थिक नुकसान भरून निघावे यासाठी बांदा पासून ते थेट ग्राहकापर्यंत ना नफा ना तोटा या तत्त्वावर फळे व भाजीपाला सुरक्षित बाजार म्हणुन आम्ही नूतन मराठा महाविद्यालयाचे प्रांगण जळगाव येथे दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत भरवित आहोत याची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ अशी राहील यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून भाजीपाला थेट आपल्या पर्यंत पोहोचवा ,भाजीपाला घ्यायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे सॅनिटांयझीग करणे, सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करणे, भाजीपाला व फळे नागरिकांना रास्त दरात मिळणे ,कोरोणा आजाराची काळजीच्या अनुषंगाने स्वस्त दरात मास्क सुद्धा येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.यासाठी जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट या दोन्ही संस्था संयुक्त विद्यमाने हा जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी सुरक्षित बाजार असा ना नफा ना तोटा तत्त्वावर उपक्रम राबवित आहेत.