<
जळगांव(प्रतिनिधी)- सध्या आपण लॉक डाऊन’मुळे घरीच असून कोरोना विषाणूचा मुकाबला करीत आहोत त्याच प्रमाणे आपले दैनंदिन कार्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ते घरात राहूनच आपल्याला पार पाडायचे आहे व देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम व्हाट्सअप च्या माध्यमातून देत असतो तसेच कोरोना बद्दल जागृती तसेच शासन पातळीवरील माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना देतो. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदान मिळवण्यासाठी सहकाऱ्यांशी हितगुज करून पुढील दिशा ठरवीत असतो त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांविषयी आपुलकी असल्यामुळे उन्हाळ्यात त्यांना पाणी व अन्न उपलब्ध व्हावे यासाठी मित्रांना फोन द्वारे जागृती करून त्यांच्यासाठी प्रत्येकाने घरी परळ, अन्न व पाणी टाकावे यासाठी प्रयत्न करतो. रोज नियमित व्यायाम व योगासनाच्या साह्याने शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी संध्याकाळी एक तास व्यायाम करतो वृत्तवाहिन्या बघतो, वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून काही समस्या जाणून त्यातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. लाॅकडाऊन मुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत असल्यामुळे मुलांबरोबर घरातील इतरांसोबत मनोरंजक खेळ खेळतो व त्यांचे जीवनही आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करतो.