<
भडगाव(प्रमोद सोनवणे)- आपल्या रूढी आणि परंपरा पाळतांना आपला विवेक जागृत असला तर नक्कीच त्या कालबाह्य झालेल्या रूढींना कालसुसंगत असा पर्याय देता येतो,कारण फक्त चूकीचे काय ते सांगून उपयोग नसतो,तर त्याला पर्यायी असा कालसूसंगत व लोकोपयोगी उपक्रम समाजातील सर्व विवेकी नागरिकांना देणे म्हणजे खरी विधायक, कृतीशील धर्मचिकित्सा आहे,आणी ती प्रत्येक विज्ञाननिष्ठ नागरिकाचे कर्तव्य आहे किंबहुना ते प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आणि याच कर्तव्याचे पालन करण्यासाठी आमडदे ता. भडगाव येथील शेखर भाऊसाहेब भोसले व भोसले कुटुंब यांनी चि. अर्जुन शेखर भोसले याच्या शेंडीला बोकड कापण्याच्या रूढी ला फाटा देत, त्यांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे म्हणून, “ROवाॅटर प्यूरीफायर” देण्याचा संकल्प केला आहे. या विधायक कृतीशील कार्यक्रमात त्यांना तमाम गावकरी व मित्र परिवार यांची साथ आहे, तसेच संपूर्ण भोसले कुटुंबीयांनी केलेल्या या संकल्पा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समाजाला प्रेरणादायी संदेश देण्याच काम करताय
शेडींला बोकडाचा बळीचा फाटा देत गावाला शुद्ध पिण्याचे पाणी साठी वॉटर प्युरिफायर देणे
यातुन नक्कीच सामाजिक संदेश जाईल
अभिनंदन????????
तुषार देशमुख
स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र
Mpsc student rights( nanded)