<
जळगांव – जगात व देशात कोविड- 19 मुळे हाहाकार माजला आहे. सर्व जग कोरोना व्हायरस शि लढा देत आहे. भारत देशात 21 दिवसांचा लॉक डाऊन केला आहे. या मुळे गोरगरीब ,कष्टकरी ,कामगार वर्ग घरी बसून आहे. त्यांच्या कडील अन्न – धान्य संपले आहे. किराणा संपला आहे. अन्न मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपून माणुसकीचा हात पुढे करीत आपल्या वैयक्तिक बचतीतुन एका कुटुंबाला 8 दिवस पुरेल इतके किराणाचे 200 पाकीट SBI चे कर्मचारी आशिष मेंढे, अजय नांदुरकर, अजय झोपे, जितेंद्र ढोक, श्रीकृष्ण करंदीकर, अरुणाभ मल्लीक, अभय मिश्रा,अश्विन बेलसरे, पंकज नहाले, कुणाल तळेले, शफीक पिंजारी, राहुल पाटील, रवींद्र सरादे, स्नेहल नार्वेकर,अविनाश पाटील,दत्तात्रय चौधरी यांनी गव्हर्नमेंट कंत्राटदार अनुप भाऊ मनुरे यांच्या मदतीने व मानराज पार्क जवळील त्यांच्या अपाटमेन्ट याठिकाणी दिनांक 9 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 वाजता वाटप केले.त्याचप्रमाणे या आधी त्यांनी दि.३/४/२०२०रोजी ६००अन्नाची पाकिटेही वाटप केले होते, सोबत सामाजिक कार्यकर्ते विजय निकम ,विनोद निकम, मिलींद शिरसाठ, सचिन भोगे,अमर गायकवाड, आदी सहकारी उपस्थित होते.