<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) येथील पोलिस स्टेशन तर्फे संसर्गजन्य साथरोग कोरोना विषाणूच्या व मुस्लिम समाजातील सर्वात महत्त्वाची रात्र असलेल्या शबेरात या सणाच्या पार्श्वभूमीवर कासोदा पोलिस स्टेशन हद्दीतिल कासोदा शहर गावात पथसंचलन करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि , स.पो.नि.रविंद्र जाधव , पी.एस.आय.नरेश ठाकरे , यांच्या सह जळगांव मुख्यालयातील ट्रायकिंग फोर्स – व कासोदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड यांचे दि.९ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ११:३० वाजे दरम्यान रूट मार्च घेण्यात आला . त्यावेळी रूट मार्च ची सुरुवात पोलीस स्टेशन पासून ते मेन रोड मार्गे बिजली शाह चौक , सादिकशहा दर्गाह , भोई गल्ली बस स्टॉप , बिर्ला चौक , चर्मकार गल्ली , मणियार मशीद , आठवडे बाजार येथून काढण्यात आली.यावेळी आजचा मुस्लिम समाज बांधवांचा सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आव्हान केले , व पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात नजर ठेवून आहे. कुठल्याही परिस्थितीत वाद होणार नाही व कायदा सुव्यवस्था सुरळीत पार पडेल असे स.पो.नि. रविंद्र जाधव यांनी सांगितले.
तसेच कोरोना मुळे लॉकडाऊन झाल्यापासूनच कासोद्यातील सर्व चौकांमध्ये आणि सीमावर्ती भागातील सर्व मुख्य मार्गावर पोलिसांचा २४ तास पहारा आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. पोलीस विभागानेही कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गरीब नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेचे नियोजन कोरोना दक्षता समितीच्या माध्यमातून केले आहे.दरम्यान , सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी गुरूवारी दुपारी कासोदा परिसरातील नाकाबंदी पॉर्इंटला भेट देऊन पहाणी केली. गावातील मशीद , मुस्लिम समाज कब्रस्थान येथे जाऊन पाहणी केली. स्वत: बिर्ला चौकात उभे राहून बंदोबस्ताचा आढावाही घेतला. बंदोबस्तावरील पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.व त्यांनीही ती माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी कासोदा पोलीस स्टेशनला जाऊन पहाणी केली.आणि आढावा घेऊन त्यातील त्रुटी जाणून घेतल्या. व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आदेश दिले.