<
जळगाव : सध्या कोरोना या विश्वव्यापी साथरोगाचे थैमान सुरु आहे. या आजारामुळे मानवी जीवनाच्या मूलगामी आणि दूरगामी जीवनावर परिणाम होत आहे. अनपेक्षितपणे मानवाला चिंता, नैराश्य, ताण वाढत आहे. मानवाचे मानसिक आरोग्य चांगले राहावे याकरिता त्यांना मदत म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानस मैत्र ही हेल्पलाईन सुरु केली आहे. नागरिकांनी हेल्पलाईनचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मानसिक आरोग्य विभागाचे कार्यवाह डॉ. प्रदीप जोशी यांनी केले आहे.
सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घरातच कोंडले गेल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यातून त्यांना नैराश्य, चिंता, अस्वस्थता वाटणे, स्वत:ची, कुटुंबियांची काळजी वाटणे, विविध ताण येणे, एकटेपणामुळे अस्वस्थता येणे, भविष्यातील अनिश्चिततेमुळे रोजगार, आर्थिक मंदी अशा प्रश्नांनी दडपण येणे अशा तक्रारी वाढत आहे. अशा स्वरूपाच्या मानसिक अवस्थेचे पुढे गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते. त्यांना भावनिक आधार आणि धीर देण्यासाठी मानसमित्र कार्यरत असून त्यासाठी मानसमैत्र हि हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
प्राथमिक स्तरावर त्यांचे मनमोकळेपणाने ऐकून घेणे, त्यांना धीर देणे, गरजेनुसार समुपदेशन व आवश्यकता भासल्यास औषधोपचार अशा याच्या पाय-या आहेत. त्यातील भावनिक आधाराच्या टप्प्यावरच अनेक व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. राज्य पदाधिकारी आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर या हेल्पलाईनचे कार्य सुरु आहे. राज्यभरात एकूण 80 मानसमित्र काम करीत आहेत. या मानसमैत्र हेल्पलाईनचा नागरिकांनी लाभ घेत तणावमुक्त व्हावे असे आवाहन राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे,
हेल्पलाईन संपर्क खान्देश –
विनायक सावळे – ९४०३२ ५९२२६, डॉ.ठकसेन गोराणे – ९४२०८२७९२४, सुरेश थोरात – ९९६३०८६०७५९, डॉ.कल्पना भारंबे – ९४२०७८७१७८, मिनाक्षी कांबळे – ८४०८९४५६८०, दर्शना पवार – ९०७५५७०५१०, विलास रायमाळे- ९६५७१५२५८५, दीपक लांबोळे – ९६०४५०७१००, सचिन पाखले – ९२७०१६१३५२, डॉ. सुनंदा धिवरे – ९८२०५५०३७४, रणजीत शिंदे – ८२७५५९०५२४, चंद्रकांत जगदाळे – ९७६६७१७८८९, समाधान पाटील – ९८८११२११०१, दिलीप खिवसरा – ८८०५४८७९७६, कोमल गायकवाड – ७७०९८७४३७१, धीरेंद्र रावते – ९२८४६७६७८३, किरण ईशी – ९०२८९५१७२९, संदीप गिरासे – ९४२३४ ९४५१५, संगीता पाटील – ९८८१५८६५७३, नंदा देशमुख – ९६५७८१४३८७, गिरीश गायकवाड – ८८८८८०८१५२.