<
भडगाव(प्रतिनिधी)- कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागु केलेल्या लाॅकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणार्याविरूध्द गुन्हे दाखल करणात आले,३३ दुचाकींवर भडगांव पो.स्टे ला गुन्हे दफ्तरी नोंद झाले आहेत. भडगांव येथे काही विनाकारण दुचाकींवर फिरणाऱ्या वाहनांनवर भडगांव पोलिस स्टेशनच्या वतीने कारवाई करण्यात आली. भडगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पठारे, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, आबा महाजन यांनी भा.द.वि.कलम.१८८ नुसार कारवाई करून आजपावेतो ३३ दुचाकींवर कारवाई केली सर्व दुचाकी जमा केल्या आहेत. सदर जमा केलेल्या दुचाकी ह्या कोर्टातून घ्यावयाच्या आहेत असे पो.स्टे.मार्फत कळविण्यात आले आहे. या काळात विनाकारण बाहेर पडणार्या गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. भडगांव शहरात कारवाई सत्र व धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे .