<
पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असताना, कोरोना हरवायचे असेल, तर घरात बसा, कोरोनाला घरात आणू नका, कोई भी रोड पे ना निकले, मीच माझा रक्षक, माझे आरोग्य माझी जबाबदारी, घरातच रहाल तरच आपण विजयी होऊ शकतो, असा जनजागृतीपर संदेश पाचोरा नगरपरिषदेतर्फे शहरातील राजे संभाजी चौक, छत्रपती शिवाजी चौक, रेल्वे भुयारी मार्ग येथे रांगोळीच्या माध्यमातून दिनांक 09/04/2020 रोजी दिला आहे. या व्यतिरीक्त शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर कोरोना बाबत जनजागृतीपर संदेश रंगविण्यात आलेले असून छत्रपती शिवाजी चौक, नगरपालिका मुख्य गेट व राजे संभाजी चौक येथे हात स्वच्छ करण्यासाठी मोफत हॅन्ड वॉश स्टॉल उभारण्यात आलेले आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळत आहे. कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती मोहीम पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती.शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सुरु असून यावेळी मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, पोलिस निरीक्षक अनील शिंदे साहेब, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, अभियंता हिमांशू जैस्वाल, ललित सोनार, आकाश खैरनार आदी उपस्थित होते या उपक्रमास रांगोळी कलाकार सुवर्णा पाटील त्यांची विद्यार्थिनी तेजस्विनी मोघे सुकन्या तसेच पेन्टर राजेंद्र भिवसने यांचे सहकार्य लाभत आहे.