<
जळगाव(प्रतिनिधी)- तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पाणवठे आटले असून पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षांना परळ बांधून दाणे व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दिवसेंदिवस वृक्षांची होणारी कत्तल व ग्लोबल वार्मिंगमुळे पक्षांचा चिवचिवाट कमी झाला आहे पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना केली तर हा चिवचिवाट पुन्हा निर्माण करता येईल अन्यथा पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात येईल, म्हणून घुले परिवारातर्फे घराच्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षांना परळ बांधून पाणी व दाणे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था पक्षांसाठी केली आहे. घराबाहेर, गच्चीवर, मोकळ्या जागी पक्षांसाठी पाणी ठेवूया “चला वाचवु पर्यावरण, निसर्गाचे करून जतन” या उपक्रमासाठी हरी घुले, विमल घुले, किशोर घुले, संध्या घुले, मनोज घुले, डिंपल घुले, कु. तेजस्विनी यांनी परिश्रम घेतले.