<
जळगाव(प्रतिनिधि):- संपूर्ण भारतभर लॉकडाउन आहे.सर्व शाळा बंद आहेत शाळा बंद असल्यातरिहि विद्यार्थी ज्ञानाच्या प्रवाहत राहायला हवे व या काळात त्यांच्या बूद्धिला चालना मिळावी या करिता प्रगती शाळेने एक अनोखा नवोपक्रम सुरु केला आहे.विद्यार्थ्यांना रोज एक तास होमवर्क देणे.यात शाळेने प्रत्येक वर्गाचा वेगळा व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केला असून या ग्रुप द्वारे तसेच अँड्रॉइड शालेय ऍप द्वारे प्रत्येक विषय शिक्षक त्यांना समानार्थी विरुधार्थी शब्द,कठिन शब्द,गणितीय कोडे,विज्ञान व् भूगोल विषयातील मुलभुत संकल्पना,ऐतिहासिक गोष्टी,इंग्रजी मराठी निबंध लेखन इ विषयी कृतियुक्त शिक्षण दिले जात आहे. या अभ्यासासाठी त्यांना प्रत्येक विषयाच्या असलेल्या वह्यांचा उपयोग करण्यास सांगितले आहे. तसेच पालकांशी संपर्क करून विद्यार्थ्यांना या काळात वाचनाचा व लिखानाचा सराव कसा करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.ही कल्पना आमच्या शाळेचे चेअरमेन प्रेमचंदजी ओसवाल आणि अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांच्या प्रेरणेतून साकार करण्यात येत आहे. या नवोपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे.तसेच विद्यार्थ्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.