<
भडगाव(प्रमोद सोनवणे)- तालुक्यातील ओझर, अंतुर्ली, गिरड, भातखंडे बु, अंतुर्ली बु, अंतुर्ली खु, पिंपरखेड, वोझर, अंजनविहरे, उत्राण, आमडधे, लोण, येथिल शेतकरी व ग्रामस्थ मंडळी यांनी नायब तहसिलदार श्री. देवकर यांना किसान सेवा केंद्र अॅण्ड पेट्रोल पंप पुर्वरत सुरू होण्यासाठी निवेदन देण्यात आले. शेतकरी वर्गाला सदर हायवेस्टर मशिनद्वारे पिक काढावे लागते व ह्या मशिन डिझेल वर चालत असल्याने ते न मिळाल्याने पीकाचे नुकसान होत असून पीक शेतातच राहून शेतकरी वर्ग हवालदिल झाले आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर महसुल अधिकारी यांनी पेट्रोल पंपाला बंद केल्याने शेतकरी वर्गाला शेतातील संपुर्ण पीक काढणीवर आल्याने ते काढण्यासाठी मजुर शेतात येत नसल्याने शेतकर्यांना माल हाल रब्बीचे पीक काढण्यासाठी यांत्रीक अवजारांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे यांत्रीक अवजारांचा वापरासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे त्यासाठी जय मल्हार किसान सेवा केंद्र अॅण्ड पेट्रोल पंपास पुर्वरत सुरू करावे ही विनंती करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.