<
जळगाव-(जिमाका) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल 9 एप्रिल रोजी कोरोना संशयित म्हणून 8 व्यक्तींचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते.
औरंगाबाद येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार या 8 व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.