<
जगभर पसरलेल्या महामारीच्या प्रकोपामुळे भारत सरकारने संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लोकडाऊन घोषित केलेलं यामुळे वस्तीत राहणारे गरीब,मजदूर यांचा रोजगार ठप्प झालेलं.आणि त्यात अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या
कुटुंबासाठी बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राध्यापक वर्ग आणि सिव्हिल च्या विद्यार्थी वर्गाने आर्थिक मदत एकत्रीत करून बल्लारपूर च्या वेगवेगळ्या वार्डातील 80 गरजु कुटूंबाना राशन किट देऊन मदत केली.त्या राशन किट मध्ये रोज उपयोगात येणाऱ्या वस्तू त्यात तांदूळ,पीठ,डाळ,तेल,मीठ,मिर्ची पावडर,हळद पावडर,साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तू देऊ करून एक चांगल्या प्रकारे मदतीचा हात समोर केल असच सक्षम युवा तरुणांनी समोर येऊन मदत करायला हवं असं संदेश विद्यार्थी वर्गा पर्यन्त पोहचवले.
ह्या कार्याला यशस्वी करण्यासाठी कॉलेज चे प्राध्यापक नंदकिशोर सिन्हा, नीरज सिंग बैस सोबत कॉलेज चे सिव्हिल शाखेतील द्वितीय, तृतीय,चतुर्थ शाखेतील विद्यार्थी शेख अरमान,सौरभ घवघवें,शुभम राहिकवार,प्रशांत खोटेमोटे आणि बाकी विद्यार्थी वर्गानी आर्थिक मदत देऊन साहाय्य केलं.