<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन असल्यामुळे १६ मार्च पासून शाळा बंद करण्यात आल्या आहे. यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये यासाठी शाळा व शिक्षकांनी सुट्टीच्या काळातही विद्यार्थ्यांना होम वर्क देत अभ्यास करुन घेतला जात आहे. शाळेकडून पालकांचा वर्गवारी ग्रुप तयार करण्यात आला आहे, त्यात दररोज होम वर्क दिला जातो. प्रत्येक वर्ग शिक्षक पालकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासाविषयी चर्चा करत आहे. तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम दिले जात आहे. जसे की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, शब्द समूहाबद्दल एक शब्द, गणित कोडे, इंग्रजी स्पेलिंग, प्रत्येक विषयाच्या घटक निहाय चाचण्या तसेच अभ्यासाच्या यूट्यूब लिंक पाठवल्या जात आहे. तसेच प्रत्येक शिक्षक पालकांशी संवाद साधून आपल्या पाल्याना कोरोना विषयी काळजी घेण्यास सांगत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.